
From
Indiaमी हा रिव्ह्यू मुद्दाम च मराठीतून देतोय जेणे करून प्रत्येकाला समजेल , या हॉस्टेल च करावं तितकं कौतुक कमी आहे , अतिशय प्राईम लोकेशन ला हे हॉस्टेल आहे द्वारका Circle पासून अगदी १५० मीटर पाई चालत गेलो की यांची इमारत येते. हाकेच्या अंतरावर बस मिळतात ऑटो मिळतात .आणि बाजूलाच लागून domino's आहे.😅
१)इथे अतिशय स्वच्छ आणि मोकळ अस हॉस्टेल , इथला स्टाफ खूप समजूतदार आणि प्रेमळ आहे , अगदी इथ गेल्यावर घरच्या सारखं treat केलं जातं .
२) २४ तास पाणी , Ro प्युरिफायर , एअर कंडीशन आणि स्वच्छ साफ अस बाथरूम , स्वच्छ bedsheet तसेच पांघरून मिळत . तसेच
separate लॉकर हवे असल्यास ते देखील मिळते. ( मला लॉकर ची गरज नव्हती म्हणून मला माहित नाही extra charge लावतात की त्याचं price मधे देतात ते ) तुम्हाला गिझर असल्यामुळे अंघोळीला गरम पाणी सुद्धा मिळते.
३)तसेच मोफत वायफाय दिला जातो .
४) इथला स्टाफ मनमिळाऊ आणि खूप helpful असल्यामुळे तुमची कोणती ही गैरसोय ते होऊ देत नाही. अतिशय माफक दरात ६००/७०० मधे सगळ कदाचित तुम्हाला इतर कुठे मिळणार नाही.
( रिव्ह्यू मोठा आहे पण खात्री देतो तुम्ही नक्की satisfied असाल नक्की भेट द्या , मी स्वतः परीक्षा असल्याने ३ दिवस येथे राहिलो म्हणून हा खरा रिव्ह्यू) thank you...💜